मालवण पत्रकारांची आरोग्य तपासणी

मराठी पत्रकार परिषद वर्धापन दिनाचे औचित्य

मालवण दि प्रतिनिधी
मराठी पत्रकार परिषदेच्या ८४ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पत्रकार आरोग्य तपासणी दिनाचे औचित्य साधून मालवण पत्रकार समितीच्यावतीने आणि ग्रामीण रुग्णालयाच्या सहकार्याने मालवण तालुक्यातील पत्रकार बंधूंचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले

मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन दरवर्षी पत्रकार आरोग्य तपासणी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी पत्रकारांची आरोग्य तपासणी केली जाते. मराठी पत्रकार परिषदेच्या या संकल्पनेनुसार कोकण विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष बंटी केनवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पत्रकार समितीने मालवण ग्रामीण रुग्णालय येथे आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात पत्रकारांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी मालवण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुप पळसंबकर, मालवण तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष संतोष गावडे, सचिव कृष्णा ढोलम, खजिनदार सिद्धेश आचरेकर, प्रफुल्ल देसाई, मनोज चव्हाण, अमित खोत, प्रशांत हिंदळेकर, कुणाल मांजरेकर, महेश कदम, समीर म्हाडगुत, गणेश गावकर, भूषण मेतर, संग्राम कासले, सुरेश घाडीगांवकर यासह अन्य उपस्थित होते. ज्यांना काही कामानिमित्त आज येणे शक्य झाले नाही त्यांची पुढील आठवड्यात वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. या वैद्यकीय तपासणीस ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

You cannot copy content of this page