अजित गोगटे अध्यक्ष, रवींद्र तिर्लोटकर उपाध्यक्ष

देवगड खरेदी विक्री संघाची निवडी बिनविरोध

देवगड (प्रतिनिधी)
देवगड तालुका खरेदी-विक्री संघाच्या चेअरमन पदी भाजपचे ऍड अजित गोगटे तर व्हाईस चेअरमन पदासाठी भाजपचे रविंद्र तिर्लोटकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
देवगड तालुका खरेदी-विक्री संघावर भारतीय जनता पार्टीच्या सहकार परिवर्तन पॅनेलचा दणदणीत विजय झाला .सर्व १५ संचालक हे भाजपाचेच निवडून आल्यानं चेअरमन व्हाईस चेअरमन निवड अध्यासी अधिकारी अनिल राहिंज यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध पार पडली. चेअरमन पदी भाजपचे ऍड अजित गोगटे तर व्हाईस चेअरमन पदासाठी भाजपचे रवींद्र तिरलोटकर,यांची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.यावेळी जिल्हा बँक संचालक ऍड प्रकाश बोडस यांनी त्यांचे अभिनंदन केले.
या वेळी खरेदी-विक्री संघाचे सदस्य, माधव कुळकर्णी, रामदास अनभवणे,संतोष फाटक,प्रवीण राणे,राजेंद्र शेट्ये,सुभाष नार्वेकर,चंद्रकांत पाळेकर,अजित राणे,सौ संपदा बोडाळे,सौ. रेश्मा जोशी,धोंडू,कोकरे,संतोष किंजवडेकर,शैलेश जाधव भाजप पदाधिकारी कार्यकर्ते. खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक कौस्तुभ जामसंडेकर व कर्मचारी उपस्थित होते त्या सर्वांनी अभिनंदन केले.
फोटो
देवगड तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी ऍड अजित गोगटे तर उपाध्यक्ष पदी रवींद्र तिरलोटकर यांची निवड झाली त्यावेळी शुभेच्छा देतानाजिल्हा बँक संचालक ऍड प्रकाश बोडस मान्यवर

You cannot copy content of this page