उद्यापासून स्वच्छ जल से सुरक्षा अभियान उपक्रम

जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायतीनी सहभाग घ्यावा;प्रशासक प्रजित नायर यांचे आवाहन

ओरोस ता .३०-:

जलजीवन मिशनच्या माध्यमातुन स्वच्छ व शाश्वत पिण्याचे पाणी नागरिकांना नियमित पुरवठा व्हावे या उद्दात हेतुने १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत राज्यभरात “स्वच्छ जल से सुरक्षा” हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.
दुषित पाण्यामुळे विविध जलजन्य आजार पसरु शकतात. पाण्याची गुणवत्ता राखणे हि सर्व ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्ष यांनी दिलेल्या सुचनानुसार १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत राज्यभरात “स्वच्छ जल से सुरक्षा” हे अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्व पिण्याच्या पाण्याचे स्त्रोताची जैविक व रासायनिक तपासणी करण्यात येणार असुन त्याचे रिपोर्ट ऑनलाईन वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यात असलेल्या ५६५६ स्त्रोताचे जिओ टॅग करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन महसुल गाव निहाय पाच महिलांना प्रशिक्षीत करण्यात आले असुन त्याच्या माध्यमातुन पिण्याच्या पाणी नमुन्याची जैविक व रासायनिक तपासणी करण्यात येणार आहे. याकरीता लागणारे जैविक पाणी तपासणी किट ग्रामपंचायत स्तरावर वितरीत करण्यात आले आहेत, असे नायर यांनी सांगितले.
जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या सोर्स वर्षातुन एक वेळा रासायनिक तपासणी प्रयोगशाळेच्या माध्यमातुन करण्यात येत आहे. या अभियान कालावधीत गावागावातील पाणी नमुण्याची रासायनिक तपासणी रासायनिय फिल्ड टेस्ट किटच्या माध्यमातुन गावातच करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीने निवड करण्यात आलेल्या महिलाच्या माध्यमातुन पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता राखणार आहेत. यासाठी तालुकानिहाय प्रशिक्षण देण्याची कार्यवाही सुरु असुन या महिलांना रासायनिक पाणी नमुने तपासणी किटही देण्यात येणार आहे. या किटच्या माध्यमातुन गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताची फ्लोराईड, लोह, गडूळपणा(टर्बिडिटी), कॅल्शियम, मॅग्नेशियम, पीच, एकुण क्षारता ( अल्कलीनिटी), एकुण कठिणपणा ( हार्डनेस), क्लोराईड, नायट्रेट आदी घटकांची तपासाणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जनता हि आरोग्य व स्वच्छता विषयक जागृक असल्याने जलजन्य आजाराचे प्रमाण अंत्यत कमी आहे. ग्रामपंचायत निहाय प्रशिक्षित करण्यात येणा-या महिलानी आपल्या गावातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोताचे रासायनिक फिल्ड टेस्ट किटच्या माध्यमातुन करुन १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत “स्वच्छ जल से सुरक्षा” या अभियानांत सहभाग घ्यावा असे आवाहन प्रजित नायर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page