सायंकाळी शहरातून निघणा बाबांची भव्य दिव्य पालखी मिरवणूक
⚡कणकवली ता.२९-: कनकाधिपती परमहंस भालचंद्र
महाराज यांच्या ४५ वा पुण्यतिथी दिनाचा ३० नोव्हेंबर हा मुख्य दिवस असून या दिवशी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.यानिमित्त सायंकाळी भालचंद्र महाराज यांच्या पालखीची घोडे,उंट तसेच सिंधुदुर्ग वारकरी सांप्रदाय यांच्यासमेवत असंख्य भाविकांच्या उपस्थितीत
शहरातून भव्य दिव्य मिरवणूक निघणार आहे.
भालचंद्र महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त गेले चार दिवस संस्थान मध्ये सुरु असलेल्या विविध कार्यक्रमांमुळे
कणकवलीनगरी भक्तीमय झाली आहे. पहाटे ५. ३० ते ८ वा. समाधीपूजन, काकड आरती, जपानुष्ठान, सकाळी ८ ते
१०.३० वा. भजने, १०. ३० ते १२. ३० वा. समाधीस्थानी मन्युसुक्त पंचामृताभिषेक, दुपारी १२. ३० ते १ वा. आरती, दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद, दुपारी १ ते सायंकाळी ५ वा. भजने, सायंकाळी ५ वा. परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पालखीची शहरातून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री ८ वा. दैनंदिन आरती, रात्री ११ वा. अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ, म्हापण-वेंगुर्ले
यांचे कुर्मदासाची वारी हे नाटक सादर होईल. तरी भाविकांनी या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन परमहंस भालचंद्र महाराज संस्थानातर्फे करण्यात
आले आहे. आज पुण्यतिथी महोत्सवाच्या चौथ्या दिवशी भालचंद्र महाराजांच्या दर्शनासाठी
भाविकांनी गर्दी केली होती.तसेच भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी भालचंद्र महाराज यांचे दर्शन घेतले. पहाटे सकाळी समाधीपूजन, काकडआरती झाली. भालचंद्र महारुद्र महाभिषेक अनुष्ठान पार पडला. भालचंद्र महाराज यांची आरती झाली. त्यानंतर भाविकांनी
महाप्रसादाचा लाभ घेतला. स्थानिक भजनी कलाकारांनी भजने सादर करून वातावरण भक्तीमय केले. सायंकाळी डोंबिवली- ठाणे येथील ह.भ.प. वैभव ओक यांचे कीर्तन पार पडले. हे ऐकण्यासाठी श्रोत्यांची लक्षणीय उपस्थिती होती.
