मालवण पोलीस स्थानकाला संविधानाच्या प्रास्ताविकेची भेट

⚡मालवण ता.२९-: संविधान दिनानिमित्त सामाजिक न्याय विभाग व बार्टी यांच्या वतीने राज्यात समता पर्व या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत मालवण पोलिस स्थानकाला संविधान प्रास्ताविकेची भेट देण्यात आली.

यावेळी मालवण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विजय यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती खोत, पोलीस कर्मचारी विलास टेंबुलकर, पत्रकार अमित खोत, कृष्णा ढोलम, महेश कदम, भूषण मेतर उपस्थित होते. यावेळी संग्राम कसले यांनी समता पर्व २०२२ च्या उपक्रमाची माहिती दिली. समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकने व बार्टीचे महासंचालक धम्म ज्योती गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली समता पर्वचा उपक्रम राबविण्यात येत आहे.

You cannot copy content of this page