⚡कणकवली ता.२८-: परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४५ वा पुण्यतिथी महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी भालचंद्र महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती.
महोत्सवानिमित्त सुरु असलेल्या विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे कणकवलीनगरी भक्तीमय झाली आहे. सकाळी पहाटे समधीपूजन आणि काकड आरती झाली. त्यानंतर भालचंद्र महारुद्र माहभिषेक अनुष्ठान पुरोहितांच्या मंत्रोपच्चाराने पार पडला. भाविकांनी भालचंद्र महाराज यांचे दर्शन घेतले. दुपारी आरती झाल्यानंतर तीर्थप्रासादासह
भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भजनी कलाकारांनी भजने सादर करून वातावरण भक्तीमय केले. सायंकाळी गोवा येथील विवेक जोशी यांचे ‘पार्थरथी हनुमान’ या विषयावर कीर्तन झाले. हे कीर्तन ऐकण्यासाठी नागरिकांनी लक्षणीय उपस्थित होती. रात्री दैनंदिन आरती तसेच आज तिसऱ्या दिवशी कुडाळ- मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी भालचंद्र महाराज यांचे दर्शन घेतले. यावेळी परमहंस भालचंद्र महाराज संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत व
व्यवस्थापक विजय केळुसकर उपस्थित होते. भालचंद्र महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवामुळे शहरात भक्तिमय वातावरण
तयार झाले आहे. पुण्यतिथी महोत्सवानिमित्त भालचंद्र महाराज यांच्या मूर्तीची व
समाधीस्थळी फुलांची आरास करण्यात आली आहे. महोत्सवानिमित्त दर्शनासाठी
विविध ठिकाणांहून भक्त कणकवलीत दाखल झाले आहेत.२९ नोव्हेंबर रोजी कार्यक्रम
पहाटे ५.३० ते ७. ३० वा. समाधीपूजन, काकडआरती, सकाळी ८.३० ते १२.३० वा. सर्व भक्त कल्याणार्थ धार्मिक विधी, भालचंद्र महारुद्र महाभिषेक
अनुष्ठान, दुपारी १२.३० ते १ आरती, दुपारी १ ते ४ महाप्रसाद, भजने, सायंकाळी डोंबिवली–ठाणे येथील ह. भ. प. वैभव ओक यांचे ‘श्रीकृष्ण लक्ष्मणा विवाह’ या विषयावर कीर्तन होईल. रात्री दैनंदिन आरती होणार आहे.
