⚡बांदा ता.२८-: विलवडे – वरचीवाडी येथील शुभांगी सदाशिव दळवी (३४) या विवाहित ने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शनिवारी सकाळी तिने विष घेतले. स्थानिकानी त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालय सावंतवाडी येथे दाखल केले. प्राथमिक उपचार केले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला अधिक उपचारासाठी बांबोळी रुग्णालयात पाठविण्यात आले.
बांबोळी रुग्णालयात ची शुभांगीची तब्येत उपचाराला साथ देत नव्हती. अखेर रविवारी पहाटे तीची प्राणज्योत मालवली. तीने आत्महत्येचे पाऊल का उचलले याचे नेमके कारण समजू शकले नाही. परंतु तीन मुली व मुलगा नसल्याच्या मानसिक तणावाखाली असल्याने तोकाचे पाऊल उचलेल्याचे बोलले जात आहे.
बांबोळी रुग्णालयातून विलवडे सरपंच दिनेश दळवी,गणेश दळवी,प्रदिप दळवी,बाबुराव दळवी, विश्राम दळवी,कालिदास दळवी,माजी उपसभापती विनायक दळवी,सोनू दळवी आदि स्थानिकांनी सोमवारी सायंकाळी तीचा मृतदेह ताब्यात घेतला. मयत शुभांगी हीचा मृतदेह बांदा येथील प्राथमिक आरोग केद्र शवगृहात ठेवण्यात आला आहे. गोवा पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद करण्यात आली आहे. अत्यंविधी मंगळवारी सकाळी होणार आहे. तीच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे. तीच्या पश्चात पति,सासरा,तीन मुली असा परिवार आहे. विलवडे छत्रपती शिवाजी पतसंस्था लिपिक सदाशिव दळवी यांची पत्नी होय.
फोटो – शुभांगी दळवी
