१९ वर्षांखालील कबड्डी स्पर्धेत मुलींच्या गटामध्ये मालवणच्या रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाला अजिंक्यपद

⚡मालवण ता.२८-:
शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या मालवण तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेमध्ये १९ वर्षांखालील मुलींच्या गटामध्ये मालवणच्या रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय मालवण यांनी अंतिम सामन्यामध्ये बाजी मारीत अजिंक्यपद पटकावले या महाविद्यालयाची जिल्हा पातळीवरील कबड्डी स्पर्धेसाठी या संघाची निवड झाली आहे. या सामन्यामध्ये सानिया अटक हिला अष्टपैलू खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. तसेच अंतिम सामन्यामध्ये क्षितिजा खरवते हिने देखील तिला चांगली साथ दिली.

मालवण येथील बोर्डिंग ग्राउंड येथे घेण्यात आलेल्या शालेय कबड्डी स्पर्धेचा १९ वर्षाखालील मुलींचा अंतिम सामना रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय विरुद्ध टोपीवाला ज्युनिअर कॉलेज या संघामध्ये झाला. शेवटचा सामना पाहण्यासाठी क्रीडा रसिक शेवटपर्यंत जागेवर खिळून बसले होते. हा सामना अटीतटीचा झाला असून रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय सांघाच्या मुलींनी यामध्ये बाजी मारली. अंतिम सामन्यामध्ये सानिया अटक हिने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन दाखविले तर क्षितिजा खरवते, अनुष्का म्हापणकर, पूजा मुणगेकर यांनी चढाईची धुरा सांभाळत उत्तम खेळ दाखविला. तर माधवी तेली, रेश्मा पांढरे दर्शना भिसे यांनी मोक्याच्याक्षणी उत्कृष्ट पक्कड करीत अंतिम सामन्यात टोपीवाला ज्युनिअर कॉलेज या संघास धूळ चारली. रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय या संघाला प्रा. हसन खान यांचे मार्गदर्शन लाभले.

You cannot copy content of this page