सगुण जाधव;मळेवाड शाळा नंबर २ मध्ये संविधान दिन साजरा
⚡सावंतवाडी ता.२७ सहदेव राऊळ-: देशाची खऱ्या अर्थाने प्रगती झाली पाहिजे तर देशात संविधान साक्षरता निर्माण झाली पाहिजे ही काळाची गरज आहे यासाठी विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांना संविधानाची ओळख व संविधानाच्या मूल्याची माहिती झाली पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे चे समतादूत सगुण जाधव यांनी केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मळेवाड नं. २ येथे शनिवारी संविधान दिन साजरा करण्यात आला.
यावेळी जाधव बोलत होते. प्रथम संविधानाला अभिवादन करून प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय विभाग यांच्या वतीने व बार्टी, पुणे यांच्यावतीने २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत संविधान पर्व साजरे केला जात असून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे . सहाय्यक आयुक्त सिंधुदुर्ग तसेच बार्टी ,पुणे महासंचालक मा. धम्मज्योती गजभिये, सिंधुदुर्ग जिल्हा सामाजिक न्याय विभाग सहाय्यक आयुक्त मा.चिकणे साहेब यांचे मार्गदर्शनात हे संविधान पर्व साजरे केले जाणार आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा सामाजिक न्याय विभाग सहाय्यक आयुक्त मा. चिकणे सर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका दिक्षा आडारकर, लवू सातार्डेकर सर, संध्या बिबवणेकर मॅडम, संगीता राळकर मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाच प्रास्ताविक शिक्षक लवू सातार्डेकर यांनी केले .
