मच्छीमार समाजाच्या नेत्यांचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना साकडे
⚡सावंतवाडी ता.२७-: मत्स्य उत्पादन वाढीसाठी शासन दरबारी योग्य तो पाठपुरावा करावा जेणेकरून मच्छीमारांच्या टोपलीत सदैव मासे भरलेले राहतील असे साकडे मच्छीमार समाजाच्या नेत्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे घातले आहे. यावेळी त्यांना लाकडी मासा व वेताची टोपली भेटवस्तू म्हणून दिली आहे.
यावेळी मच्छीमार समाजाला भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा अशी विनंती केली.
