⚡बांदा ता२७-: सावंतवाडी तालुक्यातील पाडलोस गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ माऊली पंचायतन देवस्थानचा वार्षिक जत्रौत्सव मंगळवार दि. 29 नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी श्रींची पूजा त्यानंतर नवस बोलणे, नवस फेडणे तसेच ओटी भरणे आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. रात्रौ सवाद्य पालखी मिरवणूक होणार आहे. नंतर आजगावकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहेत. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.
पाडलोस रवळनाथचा मंगळवारी 29 रोजी जत्रोत्सव
