आंबेली–कोनाळकरवाडी अपघातानंतर ठेकेदाराविरोधात तीव्र नाराजी…

तात्काळ दुरुस्ती करा: अन्यथा आंदोलन..

⚡दोडामार्ग ता.१३-: आंबेली–कोनाळकरवाडी परिसरात झालेल्या अपघातानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी ठेकेदाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. दोडामार्ग येथील झरेबांबर पंचायत समिती सदस्य स्नेहा संजय गवस यांनी रस्ता सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ठेकेदाराची असल्याचे सांगत तात्काळ दुरुस्तीची मागणी केली.
अपघाताची माहिती मिळताच स्नेहा गवस, सरपंच अनिल शेटकर व आपा गवस यांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र, संबंधित अधिकारी व ठेकेदार अनुपस्थित असल्याने संताप व्यक्त करण्यात आला. ठेकेदाराला घटनास्थळी बोलावून सुरक्षेच्या उपाययोजना न केल्याबद्दल जाब विचारण्यात आला.
दरम्यान, संध्याकाळपर्यंत काम सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा लोकप्रतिनिधींनी दिला असून नागरिकांनी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

You cannot copy content of this page