सूचना फलक नसल्याने अपघात…

निष्काळजी ठेकेदारावर कारवाई करा: बाबुराव धुरींची मागणी..

⚡दोडामार्ग ता.१३- :तिलारी–दोडामार्ग मार्गावरील आंबेली येथे रस्त्याचे काम सुरू असताना दुचाकीस्वार थेट खोदलेल्या खड्ड्यात पडल्याने एक युवक व एक महिला गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने दोघांना बाहेर काढून उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेज येथे हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
घटनास्थळी कोणतेही सूचना फलक किंवा सुरक्षा व्यवस्था नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान, बाबुराव धुरी यांनी घटनास्थळी भेट देत निष्काळजी ठेकेदारावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.

You cannot copy content of this page