प्रवाशांना कणकवली शहरात उतरवा अन्यथा आंदोलन करणार

गटनेते संजय कामतेकर यांचा लक्झरी चालकांना इशारा

कणकवली 2 महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत कणकवली शहरात फ्लाय ओव्हर ब्रिज झाल्यानंतर मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या लक्झरी या फ्लाय ओव्हर ब्रिज वरून थेट हळवल फाट्यावर कणकवलीतील प्रवाशांना उतरवत असल्याने सध्या प्रवाशांना या प्रकारामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे लक्झरी वाहन चालकानी याबाबत निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा कणकवली नगरपंचायत चे सत्ताधारी गटनेते संजय कामतेकर यांनी दिला आहे.

श्री. कामतेकर यांनी म्हटले आहे, मुंबईहून गावी लक्झरी ने येणारे प्रवासी हे फ्लाय ओव्हर ब्रिज होण्यापूर्वी कणकवली बस स्टॅन्ड ते पेट्रोल पंपा समोर पर्यंतच्या भागात उतरत असत. सकाळच्या सत्रात या लक्झरी कणकवली दाखल होत असल्याने या ठिकाणी उतरणाऱ्या प्रवाशाना आपल्या गावी जाण्याकरिता बस स्थानक व रिक्षा स्टॅन्ड ची सुविधा उपलब्ध होत होती. मात्र आता क्वचितच काही कारणाने लक्झरी या कणकवली शहरात सर्विस रस्त्यावरून जातात. अन्यथा बहुतांशी लक्झरी या फ्लाय ओव्हर ब्रिजवरून हळवल फाट्यावर कणकवलीतील प्रवाशांना उतरवत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सकाळच्या सत्रात हळवल फाट्यावर प्रवाशांना उतरल्याने रिक्षा करिता या प्रवाशांना चालत यावे लागत आहे. संबंधित लक्झरी चालकांनी याची दखल न घेतल्यास आंदोलनात्मक पवित्रा घेण्याची इशारा श्री. कमतेकर यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page