⚡कणकवली ता.२७-: क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय विविध स्पर्धांमध्ये कणकवली कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
१९ वर्षांखालील जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेत आकाश तावडे, भाग्यश्री सावंत यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. आर्यन महाडिक, सायली वाघाटे, साजरी बातकर यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. १९ वर्षांखालील धर्नुरविद्या स्पर्धेत बालदत्त सावंत याने प्रथम क्रमांक प्राप्त केला. कराटे स्पर्धेत आशिष सावंत, दीक्षिता कदम यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. बुद्धिबळ स्पर्धेत दुर्वा पेडणेकर हिने प्रथम तर चिन्मय गावकर याने पाचवा क्रमांक प्राप्त केला. ज्युदो स्पर्धेत पल्लवी शिंदे, तन्वी पवार, कोमल जोईल, कस्तुरी तिर्लोटकर यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. बॅडमिंटन स्पर्धेत रिया कामतेकर, संघमित्रा कदम, समृद्धी खांदारे, भूमी कलिंगण, मानसी पाटील यांनी यश मिळवले. बॅटमिंटनमध्ये मुलांच्या संघाला तिसरा क्रमांक प्राप्त झाला. या संघात गणेश सामंत, घनःश्याम बेळेकर, प्रथम नाईक, रोशन भोईल, शुभम राणे यांचा समावेश होता. विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. मंगलदास कांबळे, क्रीडा शिक्षिका जे. बी. कसालकर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय तवटे, चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सचिव विजय वळंजू प्राचार्य डॉ. आर. बी. चौगुले यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
