⚡बांदा ता.२७-: न्यू इंग्लिश स्कूल मडुरा प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा सोमवार २८ नोव्हेंबर रोजी दुपारी २.३० वाजता होणार आहे.
यावेळी माजी जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत, माजी मत्स्यव्यवसाय अधिकारी नंदकुमार देसाई, माजी पर्यवेक्षक अच्युत पिळणकर, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी मकरंद तोरसकर, समन्वय समिती सहसचिव नंदकुमार नाईक उपस्थित राहणार आहेत. पालक व ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापक दशरथ घाडी, सांस्कृतिक विभागप्रमुख जे. डी. सावंत व शालेय मुख्यमंत्री पूर्वा भगत यांनी केले आहे.
