अर्चना घारे परब यांचा मंत्री केसरकर यांना पलटवार
⚡सावंतवाडी ता.२६-: महाराष्ट्रात विकासाची गंगा कोणी आणली ? हे पुऱ्या जनतेला माहिती आहे. त्यामुळे विकासाच्या आड येणारे कोण आहेत ? हे जनतेला ठाऊक आहे. त्यामुळे विकासाच्या आड येणाऱ्या कोणाच्या विचारांचा बळी द्यायचा ? हे जनतेला ही माहित आहे, असा पलटवार राष्ट्रवादीच्या कोकण विभाग अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर आज येथे पत्रकार परिषदेत केला. काल श्री. केसरकर यांनी विकासा बाबत बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीका केली होती. याला अर्चना घारे परब यांनी प्रतिउत्तर दिले.
