*💫सावंतवाडी दि.०४-:* महाराष्ट्र व गोवा राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सावंतवाडी शहराचे जागृत देवस्थान व ३६५ खेड्यांचा अधिपती असलेल्या श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा सोहळा गुरुवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमावलीचे पालन करून उत्साहात साजरा झाला. सावंतवाडीतील राज घराण्याचे दैवत असलेल्या या देवस्थानचा वाढदिवस दरवर्षी मोठा उत्सव म्हणून साजरा होतो. यावषीर्ही त्यानिमित्त सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी देवावर अभिषेक व पूजा, उत्सवानिमित्त पूजापाठ, त्यानंतर सर्व भाविकांना दर्शन व तीर्थप्रसाद, वाटप करण्यात आले. यावेळी सावंतवाडी शहरासह तालुक्यातील भाविकांनी केळी व नारळ ठेवून नवसफेड केली. यानंतर नामांकित भजनी कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ७ वाजता सावंतवाडीतील महापुरुष दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे.
श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक सोहळा उत्साहात…
