महाशिबीरास लोकांची उपस्थिती ही न्यायदानावर असलेला विश्वास दर्शविते

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जे. भारुका

⚡सिंधुदुर्गनगरी ता.११-: राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्फत महाशिबीराचे आयोजित करण्यात आले. लोकांनी या महाशिबीरास लावलेली उपस्थिती ही न्यायदानावर असलेला विश्वास दर्शविते असे उद्गार, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जे. भारुका यांनी काढले.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग या कार्यालया मार्फत बुधवार दिनांक ९ नोव्हेंबर २०२२ रोजी राष्ट्रीय विधी सेवा दिन साजरा करण्यात आला.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका म्हणाले, समाजातील दुर्लभ घटकातील लोकांना विनामुल्य तसेच कायदेशीर सेवा पुरविणे हे राष्ट्रीय विधी सेवा दिनाचे मुख्य उदिष्ट्य आहे. यामुळे जनतेला योग्य माहिती मिळण्यास मदत होईल असे ते यावेळी म्हणाले.
भारतात दरवर्षी वर्षी ९ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय विधी सेवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक ११ ऑक्टोबर १९८७ रोजी कायदेशीर सेवा प्राधिकरण कायदा १९८७ जाहीर करण्यात आला होता. सदर कायदा नोव्हेंबर १९९५ मध्ये लागू करण्यात आला.

सर्वोच न्यायालयामार्फत या दिवसाची सुरुवात करण्यात आली. दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ ते दिनांक १३ नोव्हेंबर २०२२ हा कालावधी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सकल भारत अभियान’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने दिनांक ०६ नोव्हेंबर २०२२ रोजी कणकवली महाविदयालयाच्या सांस्कृतीक हॉल मध्ये भव्य दिव्य असे महाशिबीर आयोजित करणेत आले होते. यामध्ये जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयामार्फत विविध माहिती देणारे 24 स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलव्दारे जनतेला शासकीय योजनांच्या लाभासंदर्भात विविध माहिती देण्यात आली.

विधी सेवा प्राधिकरणामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन

दिनांक ०९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते १1 या वेळेत विधी सेवा दिन व सकल भारत अभियानदिनाचे औचित साधुन सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहातील बंदीना ओळख पत्रांचे वाटप प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जे. भारुका व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, डी.बी. म्हालटकर यांचे हस्ते करण्यात आले. दुपारी १२ ते २ या वेळेत माध्यमिक विद्यालय पणदूर या हायस्कूलमधील विद्यार्थ्यींना विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग कार्यालयांमार्फत राबविणेत येणा-या विविध योजनांची माहीती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा चे सचिव तथा न्यायाधीश डी बी म्हालटकर यांनी दिली. दुपारी २.१५ ते ३.०० या कालावधीत न्यायालयीन कर्मचारी वर्गाना विधी सेवा दिनानिमीत्त विधी सेवा प्राधिकरण चे अध्यक्ष व सचिव यांनी मार्गदर्शन केले. पणदूर हायस्कूल मधील विदयार्थांना न्यायालयीन कामकाज कसे चालते या बाबतची प्रत्यक्ष माहीती होणेसाठी त्यांना जिल्हा न्यायालय संकुलातील सर्व न्यायालये दाखविणेत आली. त्यामध्ये मुख्य न्यायादंडाधिकारी न्यायालय, दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर व जिल्हा न्यायालय यामधील कामकाज कसे चालते याबाबतची पहाणी करण्यास दिली. तसेच संगणकाव्दारे दाखल होणा-या प्रकरणांची माहीती सी. आय. एस. रूम मध्ये दिली. तसेच यावेळी विविध कायदेविषयक माहीती देणारे पत्रकांचे प्रदर्शन आयोजित करणेत आले होते. सायंकाळी ४ ते ६ या वेळेत जिल्हा कारागृह वर्ग-२ सावंतवाडी या कारागृहातील न्यायालयीन बंदी यांना ओळखपत्रांचे वाटप सचिव तथा न्यायाधीश डी. बी. म्हालटकर यांचे हस्ते सावंतवाडी कारागृहात करण्यात आले. अशा प्रकारे विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन विधी सेवा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डी.बी.म्हालटकर सचिव तथा न्यायाधीश यांनी मार्गदर्शन करताना दिनांक १२ नोव्हेंबर २०२२ च्या राष्ट्रीय लोक अदालती मध्ये जास्तीत जास्त प्रकरणे निकाली कशी होतील याबाबत कर्मचारी यांनी कसोशीने प्रयत्न करावे व आपल्या शेजारी असलेल्या लोकांमध्ये जनजागृती करावी जेनेकरून विधी सेवा दिन हा दिवस साजरा केल्याचे फलनिष्पन्न होईल. या कार्यक्रमास दिवाणी न्यायाधीश ए.बी. कुरणे मा. मुख्य न्यायदंडाधिकारी ए. एम. फडतरे व सर्व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमांचे सुत्रसंचालन व आभार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक, व्ही. डी. कदम मानले.

You cannot copy content of this page