माजगाव येथील तरूणाला घातला एक लाखांचा ऑनलाईन गंडा

विज बिल भरले नसल्याचे सांगत मोबाईल केला हॅक : अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

⚡सावंतवाडी,ता.११-: विज बिल भरले नसल्याचे सांगून “टीम व्हिवर”च्या सहाय्याने मोबाईल हॅक करून माजगाव येथील तरूणाला तब्बल १ लाख ५ हजाराचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे. हा प्रकार ३ तारखेला घडला. आज त्यांनी येथील पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ठाणे अंमलदार श्री. लक्ष्मण पडकील यांनी दिली.

You cannot copy content of this page