मालवण येथील अंतोन आल्मेडा मृत्यू प्रकरण
ओरोस ता.११-:
रेवतळे येथील खलाशी अंतोन सालू आल्मेडा मृत्यूप्रकरणी पसार असलेल्या अमित कामनाथ कोयंडे (५५) रा मालवण यांचा अटकपूर्व जामीन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस जे भारुका यांनी फेटाळून लावला. अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील नितीन कोंघे यांनी सरकारी पक्षाच्यावतीने काम पाहिले.
मासेमारीस गेल्यावर समुद्रात बेपत्ता होऊन नंतर निवती समुद्रात मृतदेह सापडलेल्या रेवतळे येथील खलाशी अंतोन आल्मेडा यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या पत्नीने घातपाताचा संशय व्यक्त करत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी संशयित पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलिसांनी लहू भिकाजी जोशी (४८ रा. दांडी, श्रीकृष्णवाडी), नंदकिशोर लक्ष्मण मोंडकर (४५ रा. मोरेश्वरवाडी, वायरी-भूतनाथ ), मार्शल कोजमा डिसोझा (५२ रा. मच्छीमार्केट, सोमवार पेठ, मालवण), अमित पेडणेकर ( वय ३५) या चौघांना अटक केली होती. तर अमित कोयंडे फरार आहेत. दरम्यान, त्यांनी अटक होवू नये यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने तो फेटाळून लावला आहे.