⚡ओरोस ता.०९-: ऑल महाराष्ट्र सिलंबम असोसिएशन तर्फे शिर्डी, अहमदनगर येथे झालेल्या 19 व्या राज्यस्तरीय सिलंबम ( लाठी-काठी ) स्पोर्ट्स चॅम्पियनशिप मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा सिलंबम असोसिएशन सिंधुदुर्ग ने उत्कृष्ट कामगिरी बजावत दोन सुवर्ण, एक रौप्य व एक कास्य पदकाची कमाई केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सिलंबम खेळ प्रकारात एकाच वेळी खेळाडूंनी दोन सुवर्ण, एक रौप्य व एक कास्य पदके पटकावली.
सिंधुदुर्ग जिल्हा सिलंबम असोसिएशन ची स्थापना ऑक्टोंबर 2010 झाली. संस्थेतर्फे जिल्ह्यामध्ये ट्रेनिंग कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये निवड करून त्यांना शिर्डी येथे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठवण्यात आले.
सदर स्पर्धेमध्ये कु. नितेश गुप्ता ( न्यू इंग्लिश स्कूल ओरोस ) याला सुवर्ण, कु. जिशिना नायर ( शिक्षक, बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल, कणकवली ) हिला सुवर्ण, कु. चित्राक्षा मुळये ( संत राऊळ महाराज कॉलेज, कुडाळ ) हिला रौप्य व कु. मधुरा खडपकर ( डॉन बॉस्को ओरोस ) हिला कास्य पदक प्राप्त झाले.
यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक अॅड. विवेक राणे (प्रा. छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किर्लोस ) यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे जिल्हाभर कौतुक होत आहे.