बांद्यात श्री विठ्ठल मंदिर काकड आरतीची सांगता

⚡बांदा ता.०९-: बांदा य़ेथिल श्री विठ्ठल मंदिरात दिवाळी पाडव्यापासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत दररोज सुरु असलेल्या काकड आरती सोहऴ्याची मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात सांगता झाली. या सांगता सोहळ्यासाठी शेकडो भाविक उपस्थित होते.
दररोज पहाटे पाच वाजता मंगलमय वातावरणात भूपाळी गायन करुन हा सोहळा आरंभ होतो. मग तुपात भिजवीलेल्या काकडा ज्योतीने श्री विठ्ठल रखुमाईला ओवाळले जाते. त्यानंतर पंचांमृत महाभिषेक करुन भजन व महाआरती करण्यात येते.या वर्षी मंदिरातील लाईट बंद करुन केवळ पणत्या व काकडा ज्योतीच्या तेजात केलेली आरती भाविकांसाठी संस्मरणिय ठरली. काकडआरती सोहळा कालावधीत ४ रोजी श्री विठोबाचा जत्रोत्सव व ६ रोजी तुलसी विवाह साजरा झाला. मंगळवारी गोपाळकाला होऊन या संपुर्ण सोहळ्याची सांगता झाली. चौदा दिवस सुरु असलेल्या या सोहळ्यात अबालवृद्ध ग्रामस्थ ,महीलावर्गासह शेकडो भाविक दररोज नित्यनेमाने सहभागी होत असत.

You cannot copy content of this page