ब्रगेडियर सुधीर सावंत;मालवण येथे बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन
मालवण (प्रतिनिधी)
राज्यात वसंतदादा पाटील यांच्यानंतर जनतेसाठी झटणारा मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेली बाळासाहेबांची शिवसेना हे नवीन पर्व आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या माध्यमातून चांगले काम करून उज्वल भविष्य निर्माण करूया, सिंधुदुर्गच्या विकासासाठी झटूया असे प्रतिपादन माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी मालवण येथे बोलताना केले यावेळी श्री सावंत यांनी अजूनही काही नाराज मंडळी बाहेर आहेत ती लवकरच बाळासाहेबांच्या शिवसेनेत दाखल होतील असे सांगत शिवसेना उद्धव ठाकरे गटाला अजून राजकीय धक्के बसतील याचे संकेत दिले
मालवण पेट्रोलपंप नजीक सुरू करण्यात आलेल्या बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या मालवण कार्यालयाचे उद्घाटन सिंधुरत्न समृद्ध योजना सदस्य किरण (भैय्याशेठ) सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फित कापून करण्यात आले. यावेळी संजय आंग्रे, उद्योजक महेश राणे, बबन शिंदे, विश्वास गावकर, अरुण तोडणकर, राजा गावकर, भूषण परुळेकर, किसन मांजरेकर, उल्हास सामंत, ऋत्विक सामंत, संदेश पटेल, महेश सामंत, माजी जि.प. सदस्य अनुप्रती खोचरे, वर्षा कुडाळकर, अनघा रांगणेकर, सुनील पारकर, महेंद्र सावंत, उल्हास तांडेल, पराग खोत, बाळू नाटेकर, राजा तोंडवळकर, शेखर तोडणकर, धीरज केळुसकर, दादा वेंगुर्लेकर, बाबू केरकर, अश्विन हळदणकर, भरत खिरुळकर, पिंकू मोरे, किरण कारेकर, रामेश बेलवलकर, केतन सकपाळ, दीपक मिठबावकर, डॉ. जितेंद्र केरकर, दिव्या कोचरेकर, रिया आचरेकर, मिनल आचरेकर, भारती घारकर, लुद्दीन फर्नांडिस, शबनम शेख, तस्लिम शेख, वैशाली वाडेकर, कविता गावकर, शाईन शेख, पूजा नारिंग्रेकर, नंदिनी केसरकर, प्रिया चव्हाण, श्वेता तोडणकर, रसिका राऊळ, करण तोडणकर, अक्षय तर, गोपाळ शेलटकर, आशिष नाबर, गोविंद पेडणेकर यासह बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे मालवण तालुक्यातील कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी महेश राणे व विश्वास गावकर यांच्या हस्ते किरण सामंत व सुधीर सावंत यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी आज एक रिक्षावाला राज्याचा मुख्यमंत्री झाला ही फार मोठी गोष्ट असून यातूनच एकनाथ शिंदे यांच्या रूपाने सर्वसामान्यांचा आणि जनतेला न्याय देणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आहे. मंत्री उदय सामंत, दीपक केसरकर, दादा भुसे यांच्यामुळेच आपण मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्या गटासोबत असल्याचे श्री सावंत यांनी सांगून
मालवण कार्यालयाच्या माध्यमातून लोकांची कामे करण्यात यावीत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी प्रयत्न करूया. मालवण तालुक्यातील मच्छिमार, पर्यटन व्यावसायिक यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नाशील राहणार असून ग्रामीण रोजगार, समृद्ध गाव ही संकल्पना राबविणार आहोत. तसेच महिला बचत गट सक्ष्मीकरण केले जाणार. येथील शेतकरी, मच्छीमार, पर्यटन व्यावसायिक यांच्या समस्या सोडविण्यासाठी संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून लवकरच बैठका आयोजित करून ठोस कार्यवाही करण्यात येईल, असेही सावंत यांनी सांगितले. यावेळी उल्हास सामंत, किसन मांजरेकर, आशिष नाबर यांनीही विचार मांडले.
भाजपकडूनही शुभेच्छा !
बाळासाहेबांची शिवसेना या गटाचे संपर्क कार्यालयाचे उदघाटन पार पडल्यानंतर मालवणातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उद्योजक भैयाशेठ सामंत आणि बिग्रेडियर सुधीर सावंत यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर,माजी नगरसेवक गणेश कुशे, दीपक पाटकर, अशोक तोडणकर, राजू बिडये आबा हडकर,भाऊ सामंत, व इतर उपस्थित होते
