जिल्हा परिषद प्रशासक प्रजित नायर यांची माहिती
ओरोस ता.०९
जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत जिल्हयांतील गावे सतत हागणदारीमुक्त रहावी हे ध्येय पुढे ठेवून 3 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीमध्ये वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय बाधकाम, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत सुविधा निर्माण करणे तसेच प्लॉस्टिक प्रक्रिया युनिट व मैला गाळ व्यवस्थापन अंतर्गत तालुकानिहाय युनिट तयार करणे आदी कामे या मोहिमेंतर्गत घेण्यात येणार आहेत अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रजित नायर यांनी दिली.
19 नोव्हेंबर रोजी “जागतिक शौचालय दिवस” हा सर्वत्र राबविला जातो. त्यानिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हयांत 3 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीमध्ये या कालावधीमध्ये जागर स्वच्छतेचा ही विशेष मोहीम राबविली जाणार आहे. यादरम्यान जिल्हा व तालुकास्तरीय बैठका, वैयक्तीक शौचालयासाठी ऑनलाईन व्दारे प्राप्त अर्जावर कार्यवाही करणे, प्रलंबित वैयक्तिक शौचालय बांधकाम प्रोत्साहन पर अनुदान वितरीत करणे, एक खड्रडा शौचालयाचे रुपांतर दोन खडडा शौचालयामध्ये करणे, 500 हुन कमी लोकसंख्या असलेल्या गावात सेप्टीक टँक शौचालयाचे मैला गाळ व्यवस्थापनासाठी चर उपलब्ध करुन करुन देणे, जिल्हयांतील 10 किलोमीटर परिसरातील 500 हुन अधिक लोकसंख्या असलेल्या गावांना नागरी मैला गाळ व्यवस्थापन सुविधेबाबत जोडण्यासाठी नियोजन करणे, सार्वजनिक शौचालय देखभाल, बांधकाम, दुरुस्ती आणि नियमित वापर ही कामे मोहीम स्वरुपात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मोहीम कालावधीत सदरचे उदिदष्ठ पूर्ण करण्याच्या दृष्टीने जिल्हा व तालुकास्तरीय बैठकांचे आयोजन करणे संबधित विविध स्वयंसेवी संस्था शासकिय विभागांचा सक्रिय सहभाग आदि उपक्रमाव्दारे गावागावात जनजागृती करण्यांत येणार आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा 2 अंतर्गत तालुकास्तरावर उभारण्यात येणा-या प्लॉस्टिक संकलन युनिट व कस्टल स्तरावर तयार करण्यात येणा-या मैला गाळ व्यवस्थापन युनिट उभारणीच्या कामाना या मोहिम कालावधीत गती देण्यात येणार आहे. तसेच जास्तीत जास्त महसुन गाव हागणदारी मुक्त अधिक करण्यावर भर देण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा व स्वच्छ जिल्हा असल्याने जिल्ह्यात येणा-या पर्यटक व स्थलांतरी लोकांकरीता जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या माध्यमातुन सार्वजनिक शौचालय उभारणी करण्यात येत आहे. या मोहिम कालावधीत ज्या ग्रामपंचायतीना पर्यटनस्थळी व स्थलातरीत कुटुंबे आहेत या ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची मागणी करावी असे आवाहन यावेळी श्री. प्रजित नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी केले आहे.