अंतोन आल्मेडा मृत्यू प्रकरणी आणखी एकास अटक

⚡मालवण ता.०८-: मालवण रेवतळे येथील खलाशी अंतोन सालू आल्मेडा मृत्यूप्रकरणी मालवण पोलिसांनी यापूर्वी तिघांना अटक केली असतानाच अन्य दोन संशयितांपैकी अमित दिलीप पेडणेकर (वय ३५) याला आज अटक करून प्रकृतीच्या कारणास्तव त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केल्याची माहिती मालवण पोलिसांनी दिली आहे.

मासेमारीस गेल्यावर समुद्रात बेपत्ता होऊन नंतर निवती समुद्रात मृतदेह सापडलेल्या मालवण रेवतळे येथील खलाशी अंतोन आल्मेडा यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या पत्नीने घातपाताचा संशय व्यक्त करीत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार मालवण पोलिसांनी संशयित पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलिसांनी लहू भिकाजी जोशी (४८ रा. दांडी, श्रीकृष्णवाडी), नंदकिशोर लक्ष्मण मोंडकर (४५ रा. मोरेश्वरवाडी, वायरी-भूतनाथ ), मार्शल कोजमा डिसोजा (५२ रा. मच्छीमार्केट, सोमवार पेठ, मालवण) या तिघांना अटक केली होती. या तिघांना न्यायालयाने प्रथम पोलीस कोठडी सूनावल्यानंतर यापैकी लहू जोशी व नंदकिशोर मोंडकर यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली होती. तर मार्शल डीसोजा याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. लहू जोशी व नंदकिशोर मोंडकर यांची पोलीस कोठडी आज संपल्यानंतर दोघांचीही रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

या प्रकरणातील अन्य दोन संशयितां पैकी पोलिसांनी अमित पेडणेकर या संशयितास आज अटक केली. प्रकृतीच्या कारणास्तव त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

You cannot copy content of this page