मालवण येथील शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यालयाचा करणार शुभारंभ
मालवण दि प्रतिनिधी
उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत येत्या ८ व ९ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात बाळासाहेबांची .. शिवसेनेत अनेक जणांचे पक्षप्रवेश होणार आहेत. यावेळी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेनेचे मालवण पक्ष कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. सामंत यांच्या दौऱ्याबाबत नियोजन बैठक झाली.
यावेळी किसन मांजरेकर, बबन शिंदे, भूषण परूळेकर, विश्वास गावकर, महेश राणे, अश्विन हळदणकर, दामू सावंत, अरूण तोडणकर, उल्हास तांडेल, बाळू नाटेकर, दीपक मिठबावकर, पराग खोत, राजा गावकर, ऋत्विक सामंत आदी उपस्थित होते.
