⚡मालवण ता.३१-: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मालवणच्यावतीने बुधवार दि. २ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता सिंधुदुर्ग किल्ला स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे.
तरी सर्व तालुक्यातील पदाधिकारी, नगरसेवक, महिला आघाडी, युवासेना, शिवसैनिक, किल्ला प्रेमी, यांनी या मोहीमेत सहभागी व्हावे, असे आवाहन मालवण शहर प्रमुख बाबी जोगी व युवासेना मालवण शहर प्रमुख मंदार ओरसकर यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग किल्ल्यात २ रोजी स्वच्छता मोहीम
