१९ नोव्हेंबर रोजी कथाकथन स्पर्धा

नट वाचनालयाचे आयोजन

बांदा/प्रतिनिधी
येथील नट वाचनालयाने शालेय विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून विष्णु नारायण गांवकर आडाळी पुरस्कृत (कै.) सौ . विजयालक्ष्मी विष्णु गांवकर व (कै.) बिपीन विष्णु गांवकर यांचे स्मरणार्थ कथाकथन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा शनिवार दिनांक १९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता नट वाचनालयात होणार आहे.
सदर स्पर्धा सावंतवाडी तालुका मर्यादित असून इ .३ री व ४ थी आणि इ .५ वी ते ७ वी अशा दोन शालेय गटात होणार आहे. इ . ३ री व ४ थी या गटासाठी ‘साने गुरुजींची कथा’ हा विषय असून वेळ ३ मिनीटे आणि इ .५ वी ते ७ वी गटासाठी ‘थोर पुरुषांच्या जीवनातील प्रसंग’ हा विषय असून वेळ ४ मिनीटे देण्यात आला आहे. दोन्ही गटातील पहिल्या तीन क्रमांकाना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल. या स्पर्धेसाठी एका गटात एका शाळेतील फक्त दोनच विद्यार्थी स्विकारले जातील. तरी या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांची नावे संबंधित शाळांनी दिनांक १५ नोव्हेंबर पर्यंत नट वाचनालयात आणून द्यावीत व ही स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन नट वाचनालयाच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ग्रंथपाल प्रमिला नाईक (मो. ९४०५५७०३४९) यांच्याशी संपर्क साधावा.

You cannot copy content of this page