दुचाकी आणि व्हॅनमध्ये अपघात

दुचाकी चालक जखमी;तोरसे राष्ट्रीय मार्गावरील घटना

बांदा
तोरसे राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील पेट्रोल पंप समोरील रस्त्यावर मोटरसायकल आणि मारुती व्हॅन याच्यामध्ये अपघात होऊन मोटर सायकल स्वार जखमी झाला त्यांच्यावर म्हापसा जिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.


मोपा पोलीस स्टेशनचे निरीक्षक महेश केरकर यांनी माहिती देताना सांगितले की बांदा मार्गे विष्णु शेटकर हा आपल्या ओमनी वाहनाने वाहन क्रमांक जी ए o६आर ८७२६ तर विरुद्ध दिशेने एम एच ०७ सेवन ९९०१ यांनी थेट ओमनी वाहनाला धडक दिली त्यात मोटर्स सायकलच्या चालकाचा हात शोल्डरला मार लागला. त्याला लगेच मोपा विमानतळ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी धावपळ करून 108 वाहनातून म्हापसा डिस्ट्रिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले मोटार सायकल स्वाराचे नाव अजून कळलेले नाही.

You cannot copy content of this page