दिव्यांग बांधवांना हयात दाखले सादर करण्याचे आवाहन

⚡मालवण ता.२९-: मालवण नगरपरिषदेकडे दारिद्र्य निर्मुलन योजनेअंतर्गत ५ टक्के निधी राखीव केलेला आहे. त्यामुळे मालवण शहरातील दिव्यांग बांधवांनी दि. १० नोव्हेंबर पर्यंत हयातीचे दाखले सादर करायचे आहेत. सदरचे हयात दाखले मालवण भरड नाका येथील वायुसुत कम्युनिकेशन सेंटर मध्ये उपलब्ध आहेत, अशी माहिती सिंधुदुर्ग दिव्यांग संघटना मालवण शहर अध्यक्ष सत्यम पाटील यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page