विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटना अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी केला जाहीर निषेध
सावंतवाडी : काल कोणीतरी सोशल मीडियावर नाण्यावर केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा फोटो एडीट करुन लावून एकप्रकारे त्याने भारतीय संविधानाचा व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अवमान केला आहे. विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी निषेध केला आहे.
ते म्हणाले, राजकारणी सर्वजणच असतात. परंतु राणे यांनी गेल्या 50 वर्षांत गरीबात गरीब माणसांचे संसार उभे केले. पोटापाण्याची व्यवस्था केली. त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेतली. 1990 नंतर जिल्ह्यात काँग्रेस जनतादल यांची एकहाती सत्ता होती. शिवसेना म्हणायला भिती होती. अशावेळी सरपंच, पं.स. सभापती, जि.प.सदस्य, सभापती ते अध्यक्ष केले. गेली 50 वर्षे समाजसेवा करणाऱ्या, लोकप्रतिनिधींपासून महाराष्ट्राचे सर्वोच्च मुख्यमंत्रीपद भुषविलेल्या, जिल्ह्याचे भूषण असलेल्या ज्येष्ठ नेत्यांबाबत असे काही चुकीचे वक्तव्य करतात हे दु: खदायक आहे, असे तळवणेकर म्हणाले.