⚡कणकवली ता.२१-: वाघेरी येथील श्री पावणादेवी सहकारी दुग्धविकास व्यावसायिक संस्था या संस्थेचे दूध संकलन केंद्राचे वसुबारस च्या शुभमुहूर्तावर दूध संकलनाला सुरुवात केली. आजच्या पहिल्या दिवशी दूध संकलनामध्ये 70 लिटर दूधाने या दूध संकलनाचा श्री गणेशा झाला.
दूध संकलनाच्या उद्घाटन प्रसंगी तोंडवली गावचे श्री. नातू, पियाळी गावचे दूध व्यवसायिक नेरूळकर केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. संस्थेचे चेअरमन तथा वाघेरी गावचे सरपंच संतोष बाजीराव राणे, व्हाईस चेअरमन महेश पाटील, संचालक मारुती देवगडकर, राजेंद्र राणे, रुपेश गुरव, सुखदा राणे, विजय राऊत, मोहन वाघेरकर, सचिव सदानंद सुतार, तसेच दूध उत्पादक श्री दिनेश राणे, महेंद्र राणे, सहदेव मोंडकर, अशोक देवगडकर, चंदू गुरव, ओमकार राणे, संतोष राणे, संजय राणे, मनोज देवगडकर, सचिन राणे अन्य गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेच्या वाटचालीबाबत आणि भविष्याबाबत तरुणांनी आणि शेतकऱ्यांनी एकत्र येऊन दूध व्यवसायाला चांगला दर मिळत असल्यामुळे आणि बँकेच्या व शासनाच्या असलेल्या वेगवेगळ्या सवलतीच्या दराचा फायदा गोकुळच्या मार्गदर्शनाचा व विविध योजनांचा फायदा घेऊन आपली कौटुंबिक प्रगती या व्यवसायाच्या माध्यमातून करू शकतो. शेती पूरक हा जोड धंदा म्हणून न पाहता व्यावसायिक दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून या धंद्याला नवचैतन्य आणि चालना देऊन आपण आपल्या गावची भावना देवी दुग्ध संस्था प्रगतीपथाकडे नेण्यासाठी उपस्थित ग्रामस्थ व दूध उत्पादक शेतकरी यांना आवाहन केले. सध्याच्या परिस्थितीत दुधाला चांगला भाव व चांगले मार्गदर्शन मिळत असल्याने चाऱ्याची आपल्याकडे स्थानिक उपलब्धता असल्याने हा व्यवसाय आपणा सर्वांना यशाकडे घेऊन जाणार आहे. असेही आवाहन संस्थेचे चेअरमन व गावचे सरपंच संतोष राणे यांनी केले. मारुती देवगडकर यांच्या घरात दूध संकलन केंद्र सुरू केले आहे.
