⚡कणकवली ता.२१-: वरवडे ग्रामपंचायत येथे वरवडे ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष हनुमंत बोंद्रे यांचा भाजपा उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत यांच्या हस्ते आणि सरपंच प्रभाकर बांदल यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजप उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत, संदीप चव्हाण, अण्णा साटम, सरपंच भाई बांदल, केंद्रप्रमुख मसुरकर, भाई बोंद्रे, संजय पोळ, विजय कोदे, मधुकर परब, धनंजय सावंत, अजिम कुडाळकर, विजय कदम, प्रदीप घाडीगावकर, अमोल बोंद्रे, सिरेल फर्नांडिस, विजय सावंत सुनील सावंत, हसन खोत, महेश कदम, हनीफ शेख, ग्राम विकास अधिकारी पावस्कर, वरवडे ग्रामपंचायत सर्व सदस्य, वरवडे ग्रामस्थ उपस्थित महिला वर्ग अधिक उपस्थित होते.
