जिल्हा माहिती कार्यालय आणि मुख्यालय पत्रकार संघाचे नियोजन
ओरोस ता.१७-:
कोरोना काळात विशेषत: लॉकडाऊनमध्ये हेमंतकुमार चव्हाण यांनी माहिती, बातमी देवून पत्रकारांचे काम सोपे केले. असा गौरवोल्लेख जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वालावलकर यांच्यासह अन्य पत्रकारांनी केला.
जिल्हा माहिती कार्यालयातील माहिती सहायक हेमंतकुमार चव्हाण यांची सातारा येथे माहिती अधिकारी पदावर पदोन्नतीने बदली झाली. त्या निमित्ताने जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्यावतीने त्यांचा पुस्तक, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गणेश जेठे, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष बाळ खडपकर, विनोद दळवी, संदीप गावडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या. जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनीही यावेळी त्यांच्या कामाचा गौरव करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. माहिती सहायक रणजित पवार यांनी सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी नंदकुमार आयरे, मनोज वारंग, दत्तप्रसाद वालावलकर, विनोद परब, सतीश हरमलकर, शांताराम राऊत जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी संदीप राठोड, रवींद्र देवरे, नरेंद्र खोबरेकर, अमित राणे, अविनाश होडावडेकर, महेंद्र भालेकर उपस्थित होते.
