बंडू हर्णे;एजी डॉटर्सच्या ताब्यात जागा दिलेली नाही
⚡कणकवली ता.१४-: शिवसेना खास.विनायक राऊत व आ.वैभव नाईक यांच्या सोबत बसून शिल्लक सेनेचे उपनेते स्वतःला प्रबोधनकार समजणारे गौरीशंकर खोत यांनी एजी डॉटर्सच्या काही प्रश्न उपस्थित केले.मात्र,एजी डॉटर्सच्या ताब्यात जागा दिलेली नाही. बेस्ट संघटनेमध्ये झोल केलेल्या गौरीशंकर खोत यांनी आम्हाला शिकवू नये.कणकवली नगरपंचायतवर प्रबोधनकार गौरीशंकर खोतानी विचार करुन बोलवे ,असा इशारा उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिला आहे.
कणकवली नगरपंचायत येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी माजी नगरसेवक किशोर राणे उपस्थित होते.
एजी डॉटर्सबद्दल ८ जानेवारी मध्ये प्रकल्पाला सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांची परवानगी नगरपंचायतने घेतली.त्याना ३ एकर कचरा प्रकल्प राबविण्यासाठी ३ लाख ५४ हजार वार्षिक भाडे निश्चित सर्वसाधारण सभेत करण्यात आले.त्यासाठी ६ लाख ५८ हजार डिपॉझिट ठरवून घेतले.त्यांना ३ एकर जागा देण्याबाबत कार्यवाही झाली होती,असे बंडू हर्णे यांनी सांगितले.
त्यानंतर २७ जुलै २०१९ रोजी पाहिले आणि १२ फेब्रुवारी २०२० जागेचे भाडे १० लाख १२ हजार येणे आहेत, याबातीतील त्यांना स्मरनपत्र दिलेले आहे.त्यांनी कुठचाही प्रतिसाद दिलेला नाही.त्या कंपनीला एक इंचही जागा ताब्यात दिलेली नाही.त्या जागेचा वापर आम्हीच करत आहोत.आता शेवटचे स्मरणपत्र पाठवून निर्णय घेतला जाईल.यापुढे गौरीशंकर खोत यांनी पूर्ण माहिती घेऊनच बोलवे,असा टोला बंडू हर्णे लगावला.
बेस्ट संघटनेमध्ये झोल करत आणि खाबाटा आरोप असलेले बाजूला बसवून नगरपंचायत वर बोलताना विचार करावा.खोत तुमची किंमत किती आहे ?आम्हाला माहीत आहे.उपनेत्यानी राज्य व जिल्हातील विषय हाताळायचे असतात.तुमचा दर्जा किती हे दिसून येत आहे.बोल घेवड्या लोकांनी टीका केल्यास आमच्याकडे चांगली उत्तरे आहेत. खोतानी जेल मधील उदाहरणे देत वैभव नाईक हे जेल मध्ये जाण्याचा इशारा दिला आहे,असे बंडू हर्णे दिला आहे.
