भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे शनिवारी हडी ग्रामपंचायतीत येणार

विविध संघटनांना भेडसावणाऱ्या अडचणी घेणार जाणून :तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची माहिती

⚡मालवण ता.१३-: सरपंच संघटना, ठेकेदार संघटना, वाळू चिरे आणि विविध संघटनांना भेडसावणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे शनिवारी दि. सकाळी १०.३० वाजता मालवण तालुक्यातील हडी ग्रामपंचायतीत उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली आहे.

संबंधित विविध संघटनानी आपल्या विविध प्रश्नांकडे निलेश राणे यांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेऊन त्यांची शासन स्तरावर सोडवणूक करण्यासाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली हे संयुक्तरित्या पाठपुरावा करून त्या त्या खात्याच्या मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. त्या अनुषंगाने स्थानिक पातळीवर आवश्यक सगळ्या विषयाची सोडवणूक करण्यासाठी निलेश राणे शनिवारी हडी ग्रामपंचायतीत उपस्थित राहणार आहेत, असे श्री. चिंदरकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page