⚡मालवण ता.१३-: मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे सेवांगणच्या दादा शिखरे सभागृहात १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत प्रात्यक्षिके व ध्वनिचित्रफितींसह पौवार्त्य ते पाश्चिमात्य रंगभूमीविषयक ‘मुक्तावकाश ते युक्तावकाश’ या दृकश्राव्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत ‘मुक्काम पोस्ट एम्टी स्पेस व्हाया पिटर ब्रूक’ यावर लेखक व कवी अरुण कदम मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेबाबतच्या अधिक माहिती व नावनोंदणीसाठी सेवांगण ९४२३९४६००३ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सेवांगण येथे रंगभूमीविषयक कार्यशाळा
