१५ व १६ ऑक्टोबर रोजी किल्ले हनुमंतगड दुर्गसंवर्धन मोहीम

सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग विभाग व श्री देवी माऊली सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ फुकेरी यांच्यावतीने आयोजन

⚡सावंतवाडी ता.१२सहदेव राऊळ-: सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग विभाग व श्री देवी माऊली सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळ फुकेरी आणि फुकेरी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार १५ ऑक्टोबर आणि रविवार १६ ऑक्टोबर रोजी किल्ले हनुमंतगड दुर्गसंवर्धन मोहीम आयोजित केली आहे.

मोहीम निःशुल्क असुन ज्याला मोहिमेत सहभागी व्हावयाचे आहे त्यांनी स्व खर्चाने सहभागी व्हावे. मोहिमेस येताना २ ते ३ लीटर पिण्याचे पाणी, सुका खाऊ, टोपी, रेनकोट आदी सोबत घ्यावयाचे आहे. आजारी असल्यास मोहिमेत सहभागी होऊ नये. मोहिमेला येताना जर संस्थेच टी शर्ट किंवा आयडी कार्ड असेल तर घालुन यावे. किल्ले हनुमंतगड फुकेरी गड पायथ्याशी सर्वांनीं भेटायचे आहे. संवर्धन करतेवेळी मोहीम प्रमुखांच्या आदेशाचे पालन करावे. अधिक माहितीसाठी सुनिल राऊळ – ९६३७८२६३१५ व चिंटु आईर – ९८२३७३३४९४ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page