दाभोळे तलाठयावर लाचलुचपत विभागाची कारवाई
देवगड-प्रतिनिधी
देवगड तहसिलदारांनी दिलेल्या आदेशानुसार आपल्या वडिलांच्या शेतजमिनीच्या ७/१२ उता-यावरती कुळ म्हणुन नोंद करण्यासाठी दाभोळे तलाठी उत्त्म गंगाराम कदम यांनी पाच हजाराची लाच मागून तडतोडीने तीन हजार रुपये लाच स्वीकारत असताना सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी दुपारी २.४५वा. सुमारास तलाठी कार्यालय दाभोळे येथे रंगेहाथ पकडले आहे.
दाभोळे गावातील एका शेतक-याच्या वडिलांच्या नावाच्या ७/१२ वरती तहसिलदार यांनी कुळ म्हणून नोंदणीचा आदेश दिला होता. सदर ७/१२ दप्तरी कुळाची नोंद करण्यासाठी त्या शेतक-याच्या मुलाने दाभोळे तलाठी उत्त्म कदम यांच्याकडे अर्ज केला होता. सदरचे कुळाची नोंद करण्यासाठी दाभोळे तलाठी उत्त्म गंगाराम कदम यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र तडजोडीने तीन हजार रुपयाची तडजोड करुन सदरची लाचेची रक्कम मंगळवारी दुपारी २.४५ वा सुमारास तलाठी कार्यालयामध्ये तलाठी उत्त्म गंगाराम कदम यांनी तक्रार दारांकडून स्वीकारताना सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या पुर्वी दोन वर्षापुर्वी अनेक तलाठयांना देवगड तालुक्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. . सदरची कारवाई हि सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अप्पर पोलीस आयुक्त ठाणे पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधिक्षक अनिल घेरडीकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सिंधुदुर्ग डि वाय एस पी दिपक कांबळे,पोलीस निरिक्षक शिवाजी पाटील,पोलीस निरिक्षक आस्मा मुल्ला,सहा. पोलीस उपनिरिक्षक भार्गव फाले,जनार्दन रेवंडेकर, रवि पालकर,जितेंद्र पेडणेकर,प्रथमेश पोतनिस,कांचन प्रभू यांनी केली आहे.या बातचा अधिक तपास सदर गुन्हयातील तपास अधिकारी पोलीस निरिक्षक शिवाजी पाटील करीत आहेत.
