जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आदेश
⚡सिंधुदुर्ग दि.११-: सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या आदेशानुसार व जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांच्या अधिपत्याखाली आज सायंकाळी ६:०० ते रात्री ९: ०० वाजेपर्यंत “ऑल आऊट ऑपरेशन्सला” सुरुवात करण्यात आली. त्यानुसार एखाद्या फरार आरोपीला पकडणे, बेकायदेशीर माल जप्ती करणे, अवैध्य मालाची वाहतूक रोखणे अश्या प्रकारच्या गुन्ह्यांचा विशेष तपास केला जात आहे. हा उपक्रम महिन्यातून अचानक एकदा जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या आदेशानुसार राबविण्यात येतो.
जिल्ह्यात झिरो पॉईंट झाराप, आंबोली मार्ग, सातोळी(दाणोली)’
मालवण चौके, कणकवली फोंडा, ओरोस जिजामाता चौक, आदी ठिकाणी ही योजना राबविण्यात येते आहे. त्यानुसार वाहतूक शाखेचे पोलिस अंमलदार चोख कामगिरी पार पाडत आहेत.
झिरो पॉईंट, झाराप येथे नाकाबंदी साठी जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर कोरे, जिल्हा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संतोष साळसकर, पोलिस उपनिरीक्षक श्री शिंगडे, दासू पवार, पोलीस हवालदार हडकर, पोलीस नाईक चव्हाण, महिला पोलिस नाईक वागतकर, पोलीस हवालदार चालक सावळ असे गाड्यांची तपासणी करीत आहे. जिल्हा वाहतूक शाखेकडून राबवण्यात येणारा हा उपक्रम नावाजण्या जोगा आहे. यामुळे अनेक अवैध्य धंद्यांना आळा बसू शकतो.
