मनसे, मनविसेच्या विविध स्पर्धाना मोठा प्रतिसाद

वेशभूषामध्ये आनंद धुरी, गरबामध्ये कोमल चव्हाण विजेते

मालवण दि प्रतिनिधी
मनसे आणि मनविसे यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण बंदर जेटी येथे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांना मालवण वासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वेशभूषा स्पर्धेत मालवणच्या आनंद धुरी याने प्रथम क्रमांक पटकावला तर उत्कृष्ट गरबा नृत्य म्हणून कोमल दिनेश चव्हाण हिला प्रथम क्रमांक मिळाला.

मालवण बंदर जेटी येथे दसरोत्सवाच्या निमित्ताने मनसे आणि मनविसे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य गरबाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर, विनोद सांडव तालुकाध्यक्ष मालवण, विशाल ओटवणेकर शहराध्यक्ष मालवण, उपतालुकाध्यक्ष प्रशांत पराडकर, राजा गावडे, निलेश मेस्त्री, जिल्हाध्यक्ष मनविसे, दया मेस्त्री उपजिल्हाध्यक्ष, सत्यवान गावडे, भारती वाघ, दीपक गुराम, गुरू तोडणकर आदी व अन्य उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या उत्स्फूर्त आयोजना बाबत तालुका मनसे व महाराष्ट्र विद्यार्थी नवनिर्माण सेना पदाधिकारी सहकारी यांचे परशुराम उपरकर यांनी विशेष कौतुक केले. त्याचबरोबर मनवीसे जिल्हाध्यक्ष निलेश मेस्त्री यांनी देखील शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय सातर्डेकर आणि प्रथमेश सामंत यांनी केले

यावर्षीचा प्रतिसाद पाहता पुढच्या वर्षी अधिक भव्यदिव्य स्वरूपात गरबा उत्सव आयोजन केले जाईल असे मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव व मनविसे जिल्हा उपाध्यक्ष प्रतीक कुबल यांनी दिली.

यावेळी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
वेशभूषा स्पर्धा निकाल :
विशेष पारितोषिक रॅचेल लुगेरा (काली माता)

प्रथम क्रमांक : आनंद धुरी (आनंद दिघे), द्वितीय क्रमांक दीपक धुरी (कलश नृत्यांगना), तृतीय क्रमांक यज्ञा (ब्रह्मराक्षस), उत्तेजनार्थ नितीन तोडणकर (वाघ)

उत्कृष्ट गरबा नृत्य :
प्रथम क्रमांक कोमल दिनेश चव्हाण, द्वितीय क्रमांक तृप्ती गावडे, तृतीय क्रमांक ऋतुजा शेलटकर

उत्कृष्ट जोडी : सानिका रावले, साक्षी नेवाळे

उत्कृष्ट ज्येष्ठ : कांचन ओटवणेकर

बालगट उत्कृष्ट : ग्रीष्मा गौरव वेर्लेकर

You cannot copy content of this page