⚡मालवण ता.११,-: शिंदे गटातर्फे मालवणात आकाश कंदील स्पर्धा २१ ऑक्टोबर रोजी भरड येथे आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत बांबूच्या काठ्या, रंगीत कागद, साधा कागद याचा वापर करून बनविलेले आकाश कंदील स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. प्लास्टिकच्या कंदिलाला स्पर्धेत प्रवेश नाही. ही स्पर्धा शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, भैय्या सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे. स्पर्धा शालेय व खुला अशा दोन गटांत घेण्यात येणार आहे.
शालेय गटातील विजेत्यांना अनुक्रमे रु. २०००, १५००, १०००, तर खुल्या गटातील विजेत्यांना अनुक्रमे रु. ३०००, २०००, १००० रुपये व इतरही पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धकांनी आपली नावे बबन शिंदे, राजा गावकर, बाळू नाटेकर यांच्याकडे द्यावीत. अधिक माहितीसाठी ९३७०४२५९९० येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
