तरंदळे येथील श्री.आई टेवणादेवी मंदिराचा भूमिपूजन सोहळा दिमाखात संपन्न…

*💫कणकवली दि.०१-:* येथील तरंदळे गावचे ग्रामदैवत श्री.आई टेवणादेवी मंदिराचा भूमिपूजन सोहळा सोमवारी तरंदळे खोतवाडी येथे दिमाखात संपन्न झाला. माहेरवाशिणींच्या हाकेला धावणारी तसेच भक्तांच्या नवसाला पावणारी अशी श्री.आई टेवणादेवीची ख्याती आहे. अशा या जागृत देवस्थानाच्या मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यावेळी गावचे पुरोहित श्री.कालिदास वरवडेकर यांनी सांगितलेल्या पूजेनुसार संतोष सावंत यांच्या हस्ते धार्मिक विधी करण्यात आल्या. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री.मधुकर प्रभुगावकर, तसेच तरंदळे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्याचबरोबर सावडाव, बेळणे, हुंबरट, लोरे नं 1, जाणवली, कणकवली, कलमठ, वरवडे, बिडवाडी, माईन, हरकुळ येथील ग्रामस्थ , पाहूणे मंडळी देखील उपस्थित होते.

You cannot copy content of this page