कणकवलीतील घटना
*💫कणकवली दि.०१-:* तिकीटा पुरते पैसे द्या म्हणत युवतीने कणकवलीत अनेकांना गंडा घातला. माझी आजी आजारी असून तिला बघण्यासाठी मी मुंबईहून आली आहे. मात्र प्रवासात माझी बॅग हरवली, माझे एटीएम, पर्स, लॅपटॉप सगळे हरवले आहे. मला प्लिज मदत करा असे म्हणत कणकवली शहरात कुणाकडून १० कुणाकडून ५० तर कुणाकडून १०० रुपये उकळत त्या युवतीने हजारो रुपये अवघ्या काही तासात गोळा केले. कुर्ता आणि जीन्स चा पेहराव आणि दिसायला देखणी असणाऱ्या त्या युवतीने बम्बय्या स्टाईलने अनेक कार्यालये, दुकानात आज सायंकाळी ५ च्या सुमारास एन्ट्री केली. एन्ट्री करताच आपली आजी आजारी असून तिला पाहण्यासाठी मुंबईहून सावंतवाडी त जाताना प्रवासात सर्व वस्तू गहाळ झाल्या.मला तिकीटा पुरते पैसे द्या अशी गोड आणि मधाळ आवाजात आर्जव केले. शहरातील काहींनी नसती ब्याद नको म्हणून सरळ खिशात हात घालून त्या युवतीला पैसे दिले. मात्र या प्रकाराची शहरात खुमासदार चर्चा सुरू आहे.
