आरोस गावातील नळयोजनेचे नुतनीकरण

धनगगरवाडीचा पाण्याचा प्रश्न मार्गी : सरपंच शंकर नाईक

⚡बांदा ता.१०-: पाण्यासाठी गावातील महिलांची आणि लहान मुलांची होणारी वणवण थांबविण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत आरोसमध्ये नळ योजना नूतनीकरण कामाचा शुभारंभ सरपंच शंकर नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. मुख्य म्हणजे धनगगरवाडीचा अनेक वर्षांचा पाण्याचा प्रश्न प्राधान्याने घेत मार्गी लावला असून आता पाणी समस्या सुटणार असे भूमिपूजन करताना सरपंच नाईक यांनी सांगितले.

पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन केल्यानंतर श्री. नाईक बोलत होते. यावेळी उपसरपंच सरिता नाईक, ग्रा. पं. सदस्य प्रसाद नाईक, विश्वजित कळंगुटकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजन नाईक, ग्रामस्थ सुरेश देसाई, फटी नाईक, विजू नाईक, जयानंद नाईक, सुहास कोरगावकर, दत्ताराम नाईक, माजी उपसरपंच गजानन नाईक तसेच मनोहर नाईक व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
आरोस धनगगरवाडी पाण्याचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होता. वाडीतील ग्रामस्थांची उन्हाळ्यात पाण्यासाठी होणारी वणवण पाहता प्राधान्याने सदर काम हाती घेतले. जलजीवन मिशन अंतर्गत गावात एकूण 34 लाख 63 हजार 800 रुपयांचा निधी मंजूर असून पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर करण्यावर भर असणार असे सरपंच शंकर नाईक यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजन नाईक यांनी केले तर आभार प्रसाद नाईक यांनी मानले.

You cannot copy content of this page