कोळोशी येथील मासे विक्रेता हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी केला पंचनामा

⚡कणकवली ता.०८-: कणकवली तालुक्यातील कोळोशी वरचीवाडी येथे शुक्रवारी पहाटे ४:४५ वाजता ओटव येथील मच्छी विक्रेते लवू शिवाजीओटवकर (वय ७५) यांच्यावर तीन अज्ञात व्यक्तींनी हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कणकवली पोलिसांनी भा.द. वि.कलम ३२३,३२४,३४ नुसार गुन्हा अज्ञात आरोपीं विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
त्यानुसार मासे विक्रेता हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला आहे.कोळोशी,ओटव, आयनल,नांदगाव या गावातील साक्षीदारांचे जाबजबाब नोंदविण्यात आले आहेत.हल्ला कोणत्या कारणातून झाला?हल्ला करनारे आरोपी कोण आहेत?मासे आणण्याच्या वेळेत हा हल्ला झाला असल्याने संशयित आरोपी हे माहितगार असावेत,असा अंदाज पोलिसानी वर्तवला आहे.पोलिसांनी शनिवारी घटनास्थळी पंचनामा केला. फिर्यादी,साक्षीदारांचे जाबजबाब नोंदविण्यात आले आहेत.हल्ला कोणत्या कारणातून झाला?याबाबत पोलीस तपास करत आहेत.

ओटववाडी येथील मच्छीविक्रेते लवू शिवाजी ओटवकर यांच्यावर कोळोशी वरचीवाडी येथील शंकर मंदिरासमोर पहाटे हल्ला झाला.त्यानंतर फिर्यदिने आरडाओरड केल्यानंतर आरोपी इको कारमधून आले ते कोळोशीच्या दिशेने गेलेत,त्यानंतर पुन्हा कुठल्या दिशेला गेलेत? याची तपासणी पोलीस करणार आहेत.या रस्त्यावर त्या वेळेत कोणती वाहने गेली आहेत? यादृष्टीने कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर,पोलीस उपनिरीक्षक बापू खरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे करीत आहेत.

You cannot copy content of this page