सभेत नळपाणी योजने बाबतच्या समस्यांबाबत चर्चा
⚡सावंतवाडी ता.०७सहदेव राऊळ -: मळगाव ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजना धारकांची सभा गुरुवारी मळगांव इंग्लिश स्कूल मळगावच्या सभागृहात पार पडली. या सभेत नळपाणी योजने बाबतच्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी मळगाव सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, ग्रामस्थ गुरुनाथ गावकर व नळधारक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरपंच स्नेहल जामदार यांनी सर्वांचे स्वागत करून नळपाणी योजनेवर होत असलेल्या खर्चाबाबत व समस्येवर चर्चा घडवून आणली. त्यास ग्रामविस्तार अधिकारी एन. आर. तांबे यांनी सविस्तर माहिती दिली. उपस्थित ग्रामस्थांमधून गुरुनाथ गावकर यांनी रवी कांबळी व महेश तेली यांचे मागील ग्राम पाणीपुरवठा समितीत उत्कृष्ट काम केल्याबद्दल अभिनंदन केले. महेश तेली व रवी कांबळी यांनी ग्रामपंचायतीने नळ धारकांना सभेस बोलावून मार्गदर्शन केल्याबद्दल ग्रामपंचायतीचे आभार मानले व ग्रामपंचायत करत असलेल्या जलजीवन योजनेबद्दल समाधान व्यक्त केले. उपस्थित सर्व नळधारकांनी ग्रामपंचायतीला आमचे पूर्ण सहकार्य लाभेल अशा भावना व्यक्त केल्या. उपसरपंच हनुमंत पेडणेकर यांनी सभेचे आभार मानले
