दुचाकीला वॅगनर कारची धडक;युवक-युवती जखमी

⚡कणकवली ता.०३-: कणकवलीच्या दिशेने येत असलेल्या दुचाकीला नांदगावच्या दिशेने जात असलेल्या वॅगनर कारची धडक बसली. अपघातात दुचाकीवरील दोघेही जखमी झाले. दुचाकीवर २० वर्षीय युवक – युवती होते. युवक वैभववाडी येथील तर युवती कुडाळ येथील आहे. हा अपघात येथील जानवली पुलापुढील उड्डाणपुलावर सोमवारी दुपारी १.१५ वा. सुमारास घडला.

जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघातात वॅगनर कारच्या दर्शनी भागाचे तसेच दुचाकीचेही मोठे नुकसान झाले होते. अपघाताची माहिती समजताच कणकवली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजकुमार मुंढे, पोलीस नाईक पांडूरंग पाढरे आदी घटनास्थळी दाखल झाले होते.

You cannot copy content of this page