कणकवली
वन्य जीव सप्ताह निमित्त वनपरिक्षेत्र कार्यालय कणकवली वनपरिमंडळ कार्यालय भिरवडे यांच्यावतीने बिडवाडी हायस्कूल बिडवाडी या ठिकाणी वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमामध्ये वनक्षेत्रपाल राजेंद्र घुनकीकर, वनपाल भिरवडे श्री.सुतार यांनी शाळेतील मुलांना वन्य प्राण्याविषयी मार्गदर्शन केले.आवाजाचे बादशहा सोमनाथ पाटील यांनी वन्यप्राण्यांचे आवाज काढून दाखवून मुलांना वन्य प्राणी विषयी माहिती दिली. सदर कार्यक्रमाला वनक्षेत्रपाल कणकवली वनपाल भिरवांदे, वनरक्षक अविनाश राठोड ,पूजा चव्हाण,वैशाली कुंभार, गावकर तांबे व शाळेचे मुख्यध्यापक शिक्षक सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.
बिडवाडी हायस्कूल येथे वन्यजीव सप्ताह साजरा
